Vidhan Sabha 2019 : मावळला बाळा भेगडे अद्याप अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. मावळ मतदारसंघात भेगडे यांच्याबरोबरच पक्षामध्ये सुनील शेळके व रवी भेगडे हेही जोरदार इच्छुक असल्यामुळे, पहिल्या यादीत पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. 

 

पुणे : भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. मावळ मतदारसंघात भेगडे यांच्याबरोबरच पक्षामध्ये सुनील शेळके व रवी भेगडे हेही जोरदार इच्छुक असल्यामुळे, पहिल्या यादीत पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. 

Vidhan Sabha 2019 : पहिल्या यादीतून एकनाथ खडसेंना डावलले

मावळ हा भाजपचा बालेकिल्ला असून, 1995 पासून येथे भाजपचे आमदार निवडून येत आहेत. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनीही या मतदारसंघातून उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्‍य मिळाले. मात्र, भाजपमधूनच तीन प्रमुख इच्छुक असल्यामुळे, भाजपच्या पहिल्या यादीत या मतदारसंघाच्या समावेश करण्यात आला नसल्याची चर्चा आहे. बाळा भेगडे दोन वेळा मावळमधून निवडून आले आहेत. 

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांच्या राईट हॅन्डला मिळाली उमेदवारी

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no name of minister bala bhegde in bjp candidates list for Maharashtra vidhansabha 2019