BMC Election: भाजपकडून पालिका निवडणुकीची जोरदार तयारी; इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Maharashtra Politics: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यानिमित्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत.
BJP Party

BJP

esakal

Updated on

कर्जत : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत व माथेरान नगर परिषद, जिल्हा परिषदेचे सहा वॉर्ड आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संकल्प भवन येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आल्या. या मुलाखतीदरम्यान जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिणेदार, नितीन पाटील, कर्जत ग्रामीण संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे आणि कर्जत शहर मंडळ संपर्कप्रमुख नरेश पाटील उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com