esakal | BJP देश विकायला निघाली आहे : नाना पटोले
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

BJP देश विकायला निघाली आहे : नाना पटोले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : शेतकरी व कामगार विरोधातील काळे कायदे भाजप सरकारने लादले आहेत. महागाई वाढली आहे. सर्वसामान्य गरिबांची अवस्था दयनीय झाली असून भाजप (BJP) देशाला विकायला निघाला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले यांनी बोईसर येथे केली.

हेही वाचा: पालघर: धावत्या कारने अचानक पेट घेतला, जळत्या गाडीतून बाहेर पडले प्रवासी

पालघर जिल्ह्यातील जिल्हा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराकरीता पटोले पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तारापूर एमआयडीसीतील टीमा सभागृहात प्रचारसभा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आणि जिल्ह्यातील आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, भाजपची आरक्षण विरोधी मानसिकता असून कॉंग्रेस जिंकला तर देश वाचेल. ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत असून या निवडणुकीत कॉंग्रेस निश्चित विजयी होईल, असा दावाही पटोले यांनी केला.

loading image
go to top