
Mumbai: लोकसभा आणि विधासभा निवडणुकीपूर्वी मुंबईच्या विकासाच्या घोषणा झाल्या; मात्र निवडणुकांमुळे आणि चार महिने पावसाळ्याच्या काळात त्यातील अनेक प्रकल्प रखडले. आता मुंबई ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील विकासकामांची गती वाढवणार असून, मुंबई ताव्यात घेण्याची भाजपाची तयारी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करणे पालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
मुंबई शहराच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत ३२० कामे हाती घेण्यात आली होती. या प्रकल्पांचे भूमिपूजन एकाचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते.