

Amit Satam In BJP Muk Morcha
ESakal
मुंबई : ‘कोविडच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी आणि खोटेपणावर पडदा टाकण्यासाठी मतचोरीचा रडीचा डाव खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या महाविकास आघाडी करीत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पराभव नजरेसमोर दिसताच, हा तथाकथित ‘सत्याचा मोर्चा’ काढून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते. अ‘सत्याची’ आरोळी कितीही मोठी असली, तरी ‘सत्य’ कधीच विचलित होत नाही, असा घणाघात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे.