esakal | मुंबई महापालिकेत कोस्टल रोडच्या नावे १ हजार कोटींचा घोटाळा, शेलारांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

'मुंबई महापालिकेत कोस्टल रोडच्या नावे १ हजार कोटींचा घोटाळा'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : कोस्टल रोडच्या (coastal road) गतीविधींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. स्थायी समितीमध्ये या प्रकल्पामध्ये मिलीभगत होईल ही शंका होती. पॅकेजमध्ये 684 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यानुसार ३ पॅकेजमध्ये १ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. एकूणच महापालिकेत (bmc) कोस्टल रोडच्या नावाने एकूण १ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (bjp mla ashish shelar) यांनी केला. तसेच सामान्य जनतेचे पैसे कंत्राटदार की सेना, कोणाच्या खिशात गेले याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा: मी काय आहे हे तुमच्या बापाला विचारा, चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर पलटवार

माईनमधून भरणी मटेरियलबाबत मान्यता प्राप्त केली नाही. रॉयल्टीचे 630 कोटी भरले गेले नाही. ऑक्टोबर 2018 ते 2020 मध्ये ओव्हर लोड वाहने मुंबई रस्त्यावरून गेली. ओव्हर लोडिंगच्या नावाने 81 कोटी घोटाळा केला. प्रत्यक्ष ने-आण करणाऱ्या वाहन फेऱ्यामध्ये 35 हजार फेऱ्या वाढीव दाखविण्यात आल्या आहेत. वादळामध्ये भरणीचे मटेरियल वाहून गेले आहे. आमच्याकडे या सर्व घोटाळ्याचे पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेने किती भरणी मटेरियल समुद्रात वाहून गेले हे स्पष्ट करावे. सत्ताधारी शिवसेनेवर घोटाळा केल्याचा आमचा आरोप आहे. मान्यता प्राप्त नसलेल्या क्वारीमधून मटेरियल आणले गेले. याबाबत मी आयुक्तांना मी पत्र पाठवले आहे. मात्र, त्याचे अद्याप उत्तर मिळाले नाही. मुंबई कोस्टल रोडचे काम झाले पाहिजे. कोस्टल रोडमध्ये भ्रष्ट्राचार झाला आहे. त्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी. गेल्या दोन वर्षांत सभागृह न भरल्याने आम्ही लढा देऊ शकलो नाही. हा ट्रेलर आहे. अख्खा पिच्चर आम्ही पुढे आणू, असा थेट इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. तसेच राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा हा घोटाळा आहे. मुख्यमंत्री याला गांभीर्याने घेतील का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, प्राणिसंग्रहालयात ठेवण्यासाठी दक्षिण कोरियातून आठ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एकाचा सुमारे दोन महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला होता. त्यावरून शिवसेनेवर टीका झाली होती. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता पुन्हा आशिष शेलार यांनी पेंग्विन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याला काँग्रेसचेही समर्थन होते, असाही आरोप त्यांनी केला आहे.

loading image
go to top