मोठी बातमी : आशिष शेलार यांच्याकडे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

मोठी बातमी : आशिष शेलार यांच्याकडे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

मुंबई : २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. या वर्षात महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि लगेचच काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका देखील लागणार आहेत. यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका,  कल्याण डोंबिवली महापालिका, वसई विरार महानगरपालिका, औरंगाबाद तसेच कोल्हापूर महापालिकांच्या निवडणूक आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप जोरकसपणे निवडणुकीच्या तयारीला लागलाय. मुंबईच्या भाजप निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी अतुल भातखळकरकडे सोपवण्यात आली आहे. तर आता आशिष शेलार यांच्याकडे नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची निवड नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारीपदी झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने इतर महापालिकेमधील निवडणूक प्रभारींची नवे देखील निश्चित केली आहेत. 

  • नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून गणेश नाईक, निवडणूक सहप्रमुख म्हणून मंदा म्हात्रे, निवडणूक संघटनात्मक प्रमुख म्हणून संजय उपाध्याय तर निवडणूक प्रभारी म्हणून आशिष शेलार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 
  • तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून रवी चव्हाण तर निवडणूक प्रभारी म्हणून संजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून प्रसाद लाड जबाबदारी सांभाळतील तर निवडणूक सहप्रभारी म्हणून जयप्रकाश काम पाहतील 

मुंबईमध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप कशा प्रकारे लोकांसमोर जाईल, निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल यावर चर्चा करण्यात आली सोबतच भाजपकडून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप देखील  करण्यात आले. 

BJP leader Ashish Shelar is in charge of Navi Mumbai Municipal Corporation elections

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com