2022 मध्ये मुंबईचा महापौर भाजपचाच : आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही!

मुंबई : संख्याबळ नसल्याने आम्ही मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही!

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

युतीचा संसार मोडल्याचे भाजपने रविवारी जाहीर केल्याने मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील रंगत वाढली होती. भाजपने त्यासाठी 'लॉबिंग' सुरू केल्याचीही चर्चा होती. भाजपच्या एका नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता, अशी स्पष्ट कबुली पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली होती. आज (ता. 18) महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याने भाजपने काँग्रेसशी केलेल्या संपर्कामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाजपने स्पष्टीकरण दिल्याने नवा महापौर शिवसेनेचाच होईल, असे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाशिवआघाडी निर्माण होत आहे. मुंबई महापालिकेतही अशी 'शिवआघाडी' होणार का, याची चर्चा सुरू आहे. सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतानाच महापौर पदाची निवडणूक होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईच्या महापौर पदाला विशेष महत्त्व आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar clears about Mumbai Municipal Corporation Mayor post election