esakal | आशिष शेलारांचा सवाल, "का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?"
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष शेलारांचा सवाल, "का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?"

"तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले"- शेलार 

आशिष शेलारांचा सवाल, "का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आरेतील मेट्रो तीनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर राज्यात मुंबईकरांच्या मेट्रोवरून राजकारण सुरु झालं. उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील मेट्रो तीन कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्प लांबू नये म्हणून पर्यायी जागांचा शोध घेण्यास सुरवात केली.अशात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित जागेवर मेट्रो तीनचं कारशेड हलवता येऊ शकेल का ? याची चाचपणी सुरु असल्याचं समजतंय. 

या मुद्द्यावरूनच भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी एक ट्विट केलंय. 

महत्त्वाची बातमी :  22 आणि 23 तारखेला मुंबईत अनेक भागात पाणी येणार नाही; तुमचा परिसर या लिस्टमध्ये आहे का?

बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय मुंबईकरहो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा. मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी आणखी काही ट्विट्स केले आहेत ज्यामध्ये आशिष शेलार यांनी म्हटलंय...

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Latest News From Mumbai 

बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट. त्यामुळे जर मुंबई मेट्रोमध्ये अडथळा आणला जात असेल तर बुलेट ट्रेनमध्ये देखील अडथळा आणला जाऊ शकतो हा मेसेज सरकारकडून दिला जातोय का असा प्रश्न अनेकजण विचारतायत.

BJP leader Ashish Shelar mahavikas aaghadi mumbai metro three project bullet train BKC

loading image