esakal | सर्वात मोठी बातमी : भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी 'त्यांच्या'सोबतचा फोटो केला शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी बातमी : भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी 'त्यांच्या'सोबतचा फोटो केला शेअर

भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी अजिबात सोडत नाहीये. 

सर्वात मोठी बातमी : भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी 'त्यांच्या'सोबतचा फोटो केला शेअर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई :  सध्या भाजप आणि महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद सुरु आहेत. भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी अजिबात सोडत नाहीये. अशात महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपच्या मुंबईतील एका बड्या नेत्याने भेट घेतली. या भेटी  दरम्यान आशिष शेलार आणि सुप्रिया सुळेंचीही  भेट झाली.  या भेटीने आता अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 

भाजपच्या या बड्या नेत्याचं नाव आहे ऍडव्होकेट आशिष शेलार. आज आशिष शेलार यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी देखील चर्चा झाली. याबाबतचा एक फोटो स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून शेअर केलाय. 

मोठी बातमी - राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

सुप्रिया सुळे यांनी स्वतः हा फोटो शेअर केल्याने आता राजकीय चर्चाना उधाण आलंय. 

गेल्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालंय. या पार्श्वभूमीवर भाजपात गेलेले नेते घरवापसी करणार, अशा बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचंही समजतंय. तर दुसरीकडे भाजप आमदाराच्या पडद्यामागे भेटीगाठीही घडतायत असंही बोललं जातंय.

मोठी बातमी -  शंकरराव गडाख यांनी बांधलं शिवबंधन, मातोश्रीवर पार पडला शिवसेना पक्षप्रवेश

याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीदेखील भाष्य केलेलं. नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, "काही लोक राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरवत आहे. हे वृत्त खोटं आहे. उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादी काँगेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. पण यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

bjp leader ashish shelar met sharad pawar supriya sule shared photo