'नियोजन शून्य बेशरम खंडणी सरकार जनतेला सांगतंय..."

Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkar
Summary

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची संतप्त भावना

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra Lockdown) सुरू असलेले लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाणार नाहीत, पण काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाईल. राज्यातील काही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) हा राज्याच्या सरासरी दरापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन लगेच हटवणं शक्य नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केले. गुरूवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाउन आणखी काही दिवस वाढणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP) यांनी सरकारवर टीका केली. (BJP Leader Atul Bhatkhalkar angry over Maharashtra Lockdown Extension slams CM Uddhav Thackeray Govt)

Atul-Bhatkhalkar
MahaLockdown: दोन दिवसांत येणार नवे नियम; काय सुरू, काय बंद?

"लॉकडाउनमुळे राज्यातील जनतेचे आर्थिक कंबरडे पार मोडले आहे. रोजगार बुडाले आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. दुसरी लाट ओसरली आहे. लस उपलब्ध आहे तरीही हे नियोजन शून्य बेशरम खंडणी सरकार अजूनही जनतेला सांगते आहे, 'वाईच कळ काढा'.... यांची पोटं भरलेली आहेत यांचं काय जातंय", असं ट्वीट करत त्यांना आपली नाराजी व्यक्त केली.

Atul-Bhatkhalkar
"कोरोनाविरोधी ‘स्पिरीट’ असंच वाढवलं पाहिजे"; सरकारला टोला

दरम्यान, नवी नियमावली जाहीर करून लॉकडाऊन काही ठिकाणी कायम ठेवण्यात येणार आहेत. काही ठिकाणी नियम शिथिल केले जाणार असल्याची चर्चा आहे. कोविड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करूनच मुख्यमंत्री लॉकडाऊन नियमावलीबाबत चर्चा करणार असल्याहीची माहिती आहे. अशा परिस्थितीत येत्या २ दिवसात नवी नियमावली स्पष्ट होईल अशी चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com