MahaLockdown: दोन दिवसांत येणार नवे नियम; काय सुरू, काय बंद?

१५ जिल्ह्यांचा RED ZONE मध्ये समावेश
Mumbai-Local
Mumbai-Local
Summary

१५ जिल्ह्यांचा RED ZONE मध्ये समावेश

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेले लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाणार नाहीत, पण काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाईल. राज्यातील काही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या सरासरी दरापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन लगेच हटवणं शक्य नाही, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. गुरूवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतची सविस्तर बैठक होऊ शकली नाही, पण लवकरच बैठक होऊन दोन दिवसात नवी नियमावली जारी केली जाईल, असंही ते म्हणाले. (Maharashtra Lockdown New Rules will be Out Soon Check out list of services which can be started)

Mumbai-Local
Video: "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक

नवी नियमावली जाहीर करून लॉकडाऊन काही ठिकाणी कायम ठेवण्यात येणार आहे तर काही ठिकाणी नियम शिथिल केले जाणार असल्याची सध्या चर्चा आहे. कोविड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करूनच मुख्यमंत्री लॉकडाऊन नियमावलीबाबत चर्चा करणार असल्याहीची माहिती आहे. अशा परिस्थितीत येत्या २ दिवसात नवी नियमावली स्पष्ट होईल अशी चिन्हे आहेत.

Mumbai-Local
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, काही ठिकाणी नियम होणार शिथिल - टोपे

काय राहू शकतं सुरू अन् काय होऊ शकतं बंद?

सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती वेगवेगळी आहे. रेड झोनमधील जिल्ह्यांसाठी कडक निर्बंध कायम ठेवण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्या विभागात अत्यावश्यक सेवा वगळता सारं काही बंदच राहिल. राज्यातील विविध जिल्ह्यांतील बाजारपेठा सकाळी ११ पर्यंत सुरू असतात. त्यांचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. बाजारपेठा आणि छोटी दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात परवानगी दिली जाऊ शकते. परंतु, कोरोनाचा प्रसार नियंत्रित ठेवण्यासाठी लोकल सेवा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमागृह, नाट्यगृह हे सारं बंदच राहण्याची शक्यता आहे.

Mumbai-Local
Corona Update: मुंबईकरांना दिलासा! मृत्युदरात सातत्याने घट

15 जिल्हे रेडझोनमध्ये

राज्यातील तब्बल 15 जिल्हे हे रेडझोनमध्ये आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली,अहमदनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात मृत्यू संख्या जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याबाबत त्या-त्या पालकमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे, असंही बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com