सुशांत सिंह राजपूत प्रकरण : "....नाहीतर राज्य सरकार बरखास्त होईल"

सुशांत सिंह राजपूत प्रकरण : "....नाहीतर राज्य सरकार बरखास्त होईल"

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पोलिस तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार काम करीत असल्याची लोकांची भावना आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत, तर राज्य सरकार बरखास्त होईल, एवढे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी रोजच आरोप प्रत्यारोप, खुलासे प्रतिखुलासे होत असून महापौरांच्या विधानानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असूनही सीबीआय वा बिहारच्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची शिवसेना नेत्यांची धडपड सुरुच आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. मात्र अशी दडपशाही चालवून घेणार नाही, असेही भाजप नेते सांगत आहेत. पण या वादावादीमुळे यात खरेच कोणालातरी वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे का, तसेच उलटपक्षी कोणाला उघडे पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे का, एवढी लपवालपवी सुरु आहे म्हणजे कोठेतरी पाणी मुरते आहे का, अशीही चर्चा लोकांमध्ये रंगते आहे. 

या तपासासाठी यापुढे मुंबईत येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्याचा दावा भातखळकर यांनी केला आहे. मात्र याच प्रकरणाच्या तपासासाठी यापूर्वी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तरीही पुन्हा असे करण्याची भाषा बोलणाऱ्या महापौरांचा बोलविता धनी कोण आहे, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे, भातखळकर यांनी म्हटले आहे. 

ठाकरे सरकारची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे. या तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण सरकार काम करत आहे ही जनमानसातील भावना अशा वक्तव्यांनी आणि बेताल कृतीने प्रबळ होईल. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले गरजेचे आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ते आदेश पाळले नाहीत तर हे सरकार बरखास्त होण्यास वेळ लागणार नाही, एवढेच या मंडळींनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

bjp leader atul bhatkhalkar says thackeray government will be dismissed if they dont follow SC order

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com