बहुमत आम्हीच सिद्ध करणार : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 30 नोव्हेंबर ची मुदत सुप्रीम कोर्टाने रद्द करत विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल याचा आम्ही आदर करतो , उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करूनच दाखवू असा दावा आणि विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. चंद्रकांत पाटलांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 30 नोव्हेंबर ची मुदत सुप्रीम कोर्टाने रद्द करत विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आली आहे. यावेळी त्यांच्यासह आशिष शेलार, गिरीश महाजन उपस्थित होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोजक्या शब्दात 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो उद्या विधानसभेत आणि बहुमत सिद्ध करूनच  दाखवू 'असा दावा केला आहे.

फडणवीस सरकारला झटका; उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत

'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बहुमत चाचणीबाबत निर्णय दिला. उद्याच बहुमत चाचणी होणार, आणि आम्ही आमचे बहुमत सिद्ध करणार. त्यामुळे फडणवीसांनी उद्याऐवजी आजच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,' असे काँग्रेसचे मेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil says we will win the floor test