esakal | अधिवेशनातून पळ काढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

अधिवेशनातून पळ काढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा आरोप

अधिवेशनातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

अधिवेशनातून पळ काढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा आरोप

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई: कोरोनाच्या फैलावाचे कारण देऊन हिवाळी अधिवेशन दोन दिवसात आटोपल्यानंतर आता विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील या भीतीनेच अधिवेशनातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढीव वीज बिले, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, असे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे राहिले आहेत. त्यासंदर्भात समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे. तो आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. सर्वसामान्य लोकांकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील, ही भीती सरकारला आहे. वर्षभर कोरोनाच्या नावाखाली सरकारने काहीच केलं नाही, आता त्याच कारणास्तव अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन अधिवेशन झाले पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असाच आमचा सरकारकडे आग्रह राहील, असेही दरेकर म्हणाले. 

हेही वाचा-  मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांना 1000 रुपये दंड? मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader Pravin Darekar has criticized Mahavikas Aghadi

loading image