esakal | तुम्हाला मुस्काटदाबी नाही करु देणार, दरेकरांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

pravin-darekar-Uddhav-T

तुम्हाला मुस्काटदाबी नाही करु देणार, दरेकरांचा इशारा

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: भाजपाच्या (Bjp) १२ आमदारांचं काल वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. या मुद्यावरुन आता राज्यभरात भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात वगेवेगळ्या ठिकाणी भाजपाची आंदोलन सुरु आहेत. विधिमंडळ परिसरातही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या आमदारांनी (bjp mlas) आंदोलन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ठाकरे सरकारवर (thackeray govt) अत्यंत बोचरी टीका केली. (bjp leader pravin darekar slam thackeray govt over suspension of 12 bjp mlas)

"लोकशाहीचा खून, हत्या करण्याचं काम ठाकरे सरकारने केलय. विधिमंडळात शेतकरी, ओबीसी, मराठा आरक्षण आणि एमपीएसई असे गंभीर विषय असताना, सरकार मुस्काटदाबी करण्याचं काम करतय" असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. "जनतेचे प्रश्न, जनतेच्या मनातील असंतोष सभागृहात मांडण्यापासून रोखण्याचं काम हे सरकार करतय" असे प्रवीण दरेकर म्हणाले.

हेही वाचा: शेंबडे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले - नितेश राणे

लोकशाहीचा खून, मुडदा या सरकारने पाडलाय असा आरोप त्यांनी केला. "नियमबाह्य पद्धतीने १२ आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला आहे. आपल्या देशाची लोकशाही प्रगल्भ आहे. तुम्हाला अशा पद्धतीने मुस्काटदाबी करता येणार नाही. आज हजार ठिकाणी आंदोलन सुरु आहेत, हा वणवा असाच पेटत जाईल" असा इशारा दरेकर यांनी दिला.

loading image