esakal | सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करा, अन्यथा...भाजपाने दिला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करा, अन्यथा...भाजपाने दिला इशारा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत कोरोनाची स्थिती (corona situation) आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी आहे. पण अजूनही मुंबई लेव्हल तीनमध्येच (level three) आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्गामध्ये (traders) संतापाची भावना आहे. मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai lifeline) असलेली लोकल सेवा अजूनही सर्वसामान्यांसाठी सुरु झालेली नाही. (BJP leader pravin darekar threatens protest over Mumbai local travel)

त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. कारण लोकल सेवेवर सुद्धा हजारो रोजगार अवलंबून आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन आता भाजपाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली नाही, तर आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. ठाणे, कर्जत आणि कसारा या पट्ट्यातून नागरिकांना मुंबईत नोकरीसाठी यावे लागते. पण सध्या ते प्रवास करु शकत नाहीत.

हेही वाचा: मुंबईकरांच्या लसीकरणासंदर्भात एक चांगली बातमी

"घसबशे मुख्यमंत्री सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत तोंड उघडत नाहीत आणि दुसरीकडे ओ का ठो माहिती नसलेले काही मंत्री दररोज लोकलप्रवासाबद्दल भलत्यासलत्या घोषणा करताहेत. लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे" अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा

मुंबई लोकल (Mumbai Train) सामान्य कष्टकरी आणि करदात्यांची (Common tax payer) आहे. रेल्वे उभी करण्यासाठी भूमिपुत्रांनी (landlord) आपल्या जमिनी दिल्या आहेत. करदात्यांनी आणि कष्टकरी श्रमिकांनीही मुंबई (Mumbai) उभी केली आहे. बाहेरुन येणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबई आणि प्रवाशांच्या समस्येविषयी (Traveler's Problem) जाणीव नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा (Train traveling facility) मिळालीच पाहीजे, त्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनांनी (Railway Travelers Union) समाजमाध्यमांवर राईट टू ट्रव्हल (Right To Travel) ही चळवळ उभारली आहे.

loading image