esakal | मुंबईकरांच्या लसीकरणासंदर्भात एक चांगली बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai corona vaccination

मुंबईकरांच्या लसीकरणासंदर्भात एक चांगली बातमी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: लसीकरणासंदर्भात (vaccination drive) एक चांगली बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून लस तुटवड्यामुळे मुंबईत सरकारी केंद्रांवरील लसीकरण (govt vaccination center) बंद होते. पण आता लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आजपासून सरकार आणि महापालिकेच्या ३०० केंद्रांवर लसीकरण मोहिम (bmc vaccination) सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पालिकेला कोव्हिशिल्ड लसीचे (covieshield vaccine) 85 हजार डोस आणि कोव्हॅक्सिनचे ८ हजार डोस मिळाले आहेत. (Vaccination drive at 300 centres to resume from Monday in Mumbai)

महापालिकेने झायडस कॅडिला या औषध कंपनीला १२ ते १८ वयोगटातील मुंबईतील ५० मुलांवर लसीची चाचणी करण्यासाठी पत्र लिहिले आहे. लस तुटवड्यामुळे शुक्रवारपासून मुंबईत ३०० केंद्रांवर लसीकरण बंद होते. यापूर्वी १ जुलैला याच कारणासाठी लसीकरण थांबवण्यात आले होते.

हेही वाचा: दिव्यांगांना लोकल प्रवासाची परवानगी असूनही नाकारलं जातंय तिकीट

आता लसींचा जो साठा मिळालाय, तो दोन दिवस पुरेल इतका आहे, असे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत एकूण ४०१ लसीकरण केंद्र आहेत. त्यात ९८ लसीकरण केंद्र खासगी आहेत. मुंबईत सरकारी केंद्रांवर लसीकरण बंद असलं तरी, खासगी केंद्रांवर लसीकरण सुरु होतं.

हेही वाचा: मुंबई-पुणे एक्प्रेस वे वर नियमांची ऐशीतैशी, सर्रास लेन कटिंग

शनिवारी खासगी केंद्रांवर 48,393 लोकांना लस देण्यात आली असून, यासह शहरातील एकूण लसीकरणाची संख्या 60 लाख 9 हजार 25 वर पोहोचली आहे. आता गर्भवती महिलांचेही (Pregnant) लसीकरण मुंबईत केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) गुरुवारपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला प्रारंभ करणार आहे.

loading image