"संजय राऊतांची फक्त १० मिनिटं सुरक्षा काढा, मग बघा काय होतं.."

"संजय राऊतांची फक्त १० मिनिटं सुरक्षा काढा, मग बघा काय होतं.."

मुंबई - महाराष्ट्रात सध्या रान पेटलंय ते संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तिकेमुळे हा सगळं वाद निर्माण झालाय. या पुस्तिकेवर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शिसवसेनेनी त्यांच्या पक्षाचं नाव बदलून ठाकरे-सेना ठेवा असा सल्ला उदयनराजे यांनी दिला होता. यावर एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत, उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

काय म्हणाले होते संजय राऊत?

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जिथे जिथे येते  तिथे तिथे आम्ही नतमस्तक होतो. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीचा आम्ही मान राखतो. मात्र, शिवाजी महाराज म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या असा निशाणा संजय राऊत यांनी साधला होता. 

संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली 

यावर महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येतायत. या वादात भाजपवासी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी, संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे म्हंटलं आहे.  राऊत यांना सत्तेचा माज आलाय, त्यांची जीभ सैल सुटली आहे असं नारायण राणे म्हणालेत. यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत यांना, 'पुन्हा असं वक्तव्य केलं तर राऊत यांची जीभ जागेवर राहणार नाही' असा सज्जड दम भरलाय.    

संजय राऊत यांची फक्त दहा मिनिटं  सुरक्षा हटवा

तर नितेश राणे यांनी संजय राऊत यांना धमकीवजा इशारा दिलाय. संजय राऊत आपल्यासोबत पोलिसांची सुरक्षा घेऊन फिरतात. संजय राऊत यांची फक्त दहा मिनिटं  सुरक्षा हटवा, मग पाहा काय होतं असं नितेश राणे म्हणालेत. संजय राऊत ज्या सामनामध्ये  लिहितात ते ही त्यांना लिहिता येणार नाही असं देखील नितेश राणे म्हणालेत. 

nitesh rane warns sanjay raut on his controversial statement asked to remove security for 10 minutes 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com