

Ulhasnagar Hit And Run Case
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये हिट-अँड-रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर पळण्याच्या नादात जखमी वयोवृद्धाच्या अंगावर पुन्हा कार घालून त्यांना चिरडल्याची थरारक घटना घडली आहे. या अपघातात देवेंद्र सिंह राजपूत या 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच या प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.