
BJP leader to join Shindes Shiv Sena
ESakal
डोंबिवली : भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांची नाराजी दूर करण्यात पक्षातील वरिष्ठाना फारसे यश आल्याचे दिसत नाही. सध्याच्या घडीला एक बॅनर चर्चेला आला असून शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हात्रे यांचा फोटो झळकला आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे म्हात्रे यांच्या कार्यालयावरील फलकावरून देखील पक्षाचे चिन्ह गायब झाल्याचे दिसत असून भगव्या रंगात हा फलक झळकत आहे. यामुळे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.