"उद्धव ठाकरे यांचं सरकार कधीही गडगडेल, मध्यावधीसाठी तयार व्हा"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

  • मध्यावधी निवडणुकीची भाजपला आशा! 
  • विविध प्रकारच्या ठरावांनी होणार अधिवेशनाची सांगता 

मुंबई - राज्यातील तीन पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कधीही गडगडून मध्यावधी निवडणुकीचा कार्यक्रम राज्यात जाहीर होईल, अशी आशा भाजपला आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकासाठी सज्ज व्हा, असा आदेश कार्यकर्त्यांना भाजपच्या दोन दिवशीय राज्य अधिवेशनात देण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात यापुढे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. 

पहिल्या दिवशी नवी मुंबई येथे पक्षाचे खासदार, आमदार, माजी मंत्री, महापौर आदींची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसचे 
आगामी काळात पक्षाचा विस्तार, पाया अधिक भक्‍कम करण्यासाठी नेमकी कोणती रणनिती आखली पाहिजे यावर चर्चा झाली. 

मोठी बातमी - बापरे ! ...म्हणून प्रदीपने अंजनाच्या डोक्यात घातला गॅस सिलिंडर

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नडडा हे दुस-या दिवशी उपस्थित राहणार आहेत. ते नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करणार आहेत. यावेळी विविध प्रकारचे ठराव मांडले जाणार आहेत. यावेळी जे.पी. नड्डा हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात दहा हजाराहून अधिक भाजप कार्यकर्ते हजर राहणार आहेत.

मोठी बातमी - आरशातून तो एकटक तिच्याकडे पाहत होता, एक चुकीचा टर्न घेताच तिनं मारली उडी...

विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश,केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 

BJP leaders says be ready for mid term elections thackeray government is on the verge of collapse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders says be ready for mid term elections thackeray government is on the verge of collapse