बापरे ! ...म्हणून प्रदीपने अंजनाच्या डोक्यात घातला गॅस सिलिंडर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

मुंबई - आपली बायको कायम फोनवर बोलते म्हणून प्रदीप कदम याला तिच्यावर संशय होता. आपल्या बायकोचे  परपुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत असं कायम त्याला वाटायचं. बुधवारी रात्री प्रदीप आणि अंजनामध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं. त्याच रात्री रागाच्या भरात प्रदीपने अंजनावर LPG सिलिंडरने वार केला. जखमी अंजनाला तिच्या मुलांनी राजावाडी रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी अंजनाला मृत घोषित केलं.

मोठी बातमी -​ आरशातून तो एकटक तिच्याकडे पाहत होता, एक चुकीचा टर्न घेताच तिनं मारली उडी...

घाटकोपरमधील कातोडी पाडा भागात ही धक्कादायक घटना घडलीये. ३५ वर्षीय महिलेच्या डोक्यात तिच्याच नवऱ्याने सिलिंडर घालून हत्या केल्याची भयंकर घटना आता समोर येतेय. अंजना असं या ३५ वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. या परिसराने कातोडी पाडा भागात वातावरण दंग झालंय.  

मोठी बातमी -​ नव्या आदेशांमुळे वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीप आणि अंजना यांच्यात टोकाचे वाद सुरु होते. अशात १३ फेब्रुवारीला रात्री घरातील सर्वजण झोपले आहेत हे पाहून प्रदीप कदम सिलेंडर घेऊन आला. झोपलेल्या अंजनाच्या डोक्यात त्याने या सिलिंडरने जोरदार वार केला. जखमी बायकोला तसंच जखमी अवस्थेत ठेऊन त्याने घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये जात आत्मसमर्पण केलं.    

मोठी बातमी -​ चोरीऐवजी घरातील उंची दारू प्यायला आणि चोराला सोफ्यावर लागली झोप, मग...

याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. घाटकोपर पोलिसांनी प्रदीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.    

man hits his wife with cylinder and surrenders to police ghatkopar police registered the case 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man hits his wife with cylinder and surrenders to police ghatkopar police registered the case