जव्हारमध्ये भाजपला खिंडार

भगवान खैरनार
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मोखाडा : जव्हारमधील भाजपचे कार्यकर्ते आणि जव्हार अर्बन बँकेचे संचालक बंडू उदावंत यांनी आपले सुपुत्र ओमकार आणि कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जव्हारमध्ये भाजपला खिंडार पडले असुन जबरदस्त हादरा बसला आहे.

जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या कार्यालयात विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम व जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्या उपस्थितीत बंडू उदावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

यावेळी जव्हार शहर प्रमुख चित्रांगण घोलप, मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, जव्हारचे नगरसेवक अॅड. प्रसन्ना भोईर, जव्हार अर्बन बँकेचे संचालक डॉ. विठ्ठल सदगीर उपस्थित होते. 

Web Title: bjp leaders shift to shivsena