uddhav thackeray and raj thackeray
sakal
ठाणे - ‘मुंबईसह ठाणे, पालघर ही शहरे गुजरातला जोडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आता सुरतचे दोघे जण महाराष्ट्र लुटत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत गाफील न राहता आपली शहरे वाचवा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज ठाणेकरांना केले.