भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - भाजपच्या पक्ष स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. 6) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तात्पुरते बदल केले आहेत. 

मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना शुक्रवारी मुलुंड चेकनाका, मॉडेला चेकनाका मुलुंड, ऐरोली चेक नाका, वाशी चेक नाका येथे थांबवण्यात येईल. ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते वाहनांतून येणार असल्याने पश्‍चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोड, नेहरू रोड, धारावी टी येथून जाणे टाळावे. पर्यायी मार्ग म्हणून जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्‍चिम उपनगरांत स्वामी विवेकानंद रोड, लिंकिंग रोडचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

Web Title: BJP mahamelava the change in the traffic system