भाजपचा महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - स्त्रियांमधील वाढत्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, कर्करोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे वचन भाजपने राज्यातील महिलांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला निवडून द्यावे, असे आवाहन भाजप महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. माधवी नाईक यांनी मंगळवारी केले. 

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिलांना प्रतिनिधित्व मिळत आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या सर्वंकष विकासासाठी भाजपने प्रथमच स्वतंत्र जाहीरनामा काढून बाजी मारली आहे. या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनानुसार, भाजपला महिला मतदारांकडून कितपत फायदा होईल, हे निकालातून स्पष्ट होईल. 

असा आहे जाहीरनामा : 
कर्करोगासाठी रुग्णालयात पूर्व नियोजित दिवशी महिन्यातून एक दिवस तपासणी, उपाय व समुपदेशन करणार. 
महिलांसाठी सर्व शहरांमध्ये दोन कि.मी. च्या परिसरामध्ये स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांची निर्मिती. 
झोपडपट्टी पुनर्विकासासाठी पंतप्रधान आवास योजना. 
शालेय विद्यार्थिनीना स्व:संरक्षणाचे धडे अनिर्वाय करणार. 
महिला बचत गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वास्तू प्राधान्याने देणार. 
महापालिकेच्या ताब्यातील बाजारपेठांमध्ये अग्रस्थान देणार. 
ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी डे केअर सेंटर उभारणार, 
मोफत परिवहन सुविधा देणार. 
विशाखा समिती स्थापनेसाठी पाठपुरावा करणार, 
पाळणाघर योजनेची तत्काळ अंमलबजावणी करणार.

Web Title: BJP manifesto for women