Thane Politics: शिवसेनेच्या गडाला भाजपचा सुरुंग! ठाण्यातील अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांवर विजय

Municipal Council Election: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.
BJP wins mayoral election in Thane district

BJP wins mayoral election in Thane district

ESakal

Updated on

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेत भाजपने शिवसेना शिंदेंच्या गडाला सुरुंग लावला. या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला, तरी सर्वाधिक जागा शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात सत्ताधारी तसेच प्रभावी नेत्यांच्या पाठिंब्याने लढणाऱ्या उमेदवारांचा पराभव झाल्याने अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले. जिल्ह्यातील निवडणूक प्रामुख्याने शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढल्याने दोन्ही पक्षांनी आपापले गड गमावले. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि वाडा नगर परिषदेत भाजपचा, तर डहाणू आणि पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com