भाजप स्थापन करणार अल्पमतातील सरकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अत्यंत क्लिष्ट होत चाललाय. अशात आता निवडून आलेले आमदार राज्यात परत निवडणुका लागणार का ? या शक्यतेने चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान 8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे.  

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अत्यंत क्लिष्ट होत चाललाय. अशात आता निवडून आलेले आमदार राज्यात परत निवडणुका लागणार का ? या शक्यतेने चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान 8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे.  

दरम्यान शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या जोरावर सरकार स्थापन केलं तर, वैचारिक मतभेद जरी असलेत तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्दिष्टामुळे राज्यातील नवीन राजकीय गणित हे आपल्याला अ मिळू शकतं. हे सरकार जास्त दिवस चालू शकतं असंही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, महाराष्ट्रावर राजकीय अस्थिरतेचे ढग कायम राहतील.  

आतली खबर : बैठकीनंतर 'हे' आहे शिवसेना आमदारांच्या मनात

विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत तरीही सत्तास्थापानेबाबत काहीच ठोस माहिती अजूनही समोर येत नाही. एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात. अशात महाराष्ट्रात पहिल्यांदा निवडून आलेले आणि कमी मताधिक्याने निवडून आलेले आमदार चांगलेच धास्तावले आहेत.  

दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीतल्या प्रमुख पक्षांमधील सध्याचा संवाद आणि विसंवाद पाहता भाजप आता अल्पमतातील सरकार स्थापन करेल या शक्यतेला बळ मिळतंय.   

"एका आमदारामागे एक शाखा प्रमुख" ; सेनेच्या आमदारांवर करडी नजर

या आमदारांना वाटतेय मध्यावधी निवडणुकांची भीती ?   

राज्यात अनेक असे आमदार आहेत ज्यांना पाच हजारांपेक्षा कमी मतांनी लोकांनी निवडून दिलाय. असे आमदार आता महाराष्ट्रात जर मध्यावधी निवडणुका लागल्यात तर आपलं काय होईल या विचारांनी धास्तावले आहेत. खालील आमदारांना मिळालं पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य..  

भारतीय जनता पक्ष

 • मंगेश चव्हाण (चाळीसगाव),
 • गोवर्धन शर्मा (अकोला पश्‍चिम)
 • हरीश पिंपळे (मूर्तिजापूर)
 • मोहन मते (दक्षिण नागपूर)
 • विकास कुंभारे (मध्य नागपूर)
 • मदन येरावार (यवतमाळ)
 • डॉ. संदीप धुर्वे (आर्णी)
 • मेघना बोर्डीकर (जिंतूर)
 • कुमार आयलानी (उल्हासनगर)
 • राहुल कुल (दौंड)
 • भीमराव तापकीर (खडकवासला)
 • बबनराव पाचपुते (श्रीगोंदा)
 • राम सातपुते (माळशिरस)
 • जयकुमार गोरे (माण)

 शिवसेना

 • किशोर पाटील (पाचोरा)
 • दिलीप लांडे (चांदिवली)
 • संजय पोतनीस (कलिना)
 • शहाजीबापू पाटील (सांगोला)

राष्ट्रवादी

 • मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव)
 • राजेश टोपे (घनसावंगी)
 • माणिकराव कोकाटे (सिन्नर)
 • दत्तात्रय भरणे (इंदापूर)
 • सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
 • चेतन तुपे (हडपसर)
 • आशुतोष काळे (कोपरगाव)
 • संदीप क्षीरसागर (बीड)
 • राजेश पाटील (चंदगड)

काँग्रेस

 • के. सी. पाडवी (अक्‍कलकुवा)
 • अमित झनक (रिसोड)
 • सुभाष धोटे (राजुरा)
 • मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण)

इतर पक्ष

 • फारूक शहा (एमआयएम, धुळे)
 • विनोद निकोले (माकप, डहाणू)
 • राजेश पाटील (बविआ, बोईसर)
 • रईस शेख (सप, भिवंडी पूर्व)
 • अपक्ष -चंद्रकांत पाटील (मुक्‍ताईनगर) 
 • राजेंद्र राऊत (बार्शी)

Webtitle : BJP might form minority government in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP might form minority government in maharashtra