"मी आजही संयम ठेऊन आहे" याचा अर्थ काय? अतुल भातळखकर यांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल...

"मी आजही संयम ठेऊन आहे" याचा अर्थ काय? अतुल भातळखकर यांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल...

मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या, "मी आजही संयम ठेऊन आहे", या विधानाचा अर्थ काय, ते धमकी देत आहेत का आणि संयम सुटल्यावर ते काय करणार, असे प्रश्न भाजप आमदार अतुल भातळखकर यांनी उपस्थित केले आहेत. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येच्या तपासासंदर्भात ठाकरे यांच्या अन्य काही विधानांवरून कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  

सुशांतसिंह प्रकरणी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेताना वरील उद्गार काढले होते. त्याला भातखळकर यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. मागे राज्य मंत्रीमंडळातील एका सदस्यावर सामान्य नागरिकाला आपल्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप झाला होता. संयम सुटणे म्हणजे तशा पद्धतीचे काही करणे, असा त्याचा अर्थ लोकांनी घ्यावा का, हे देखील राज्याच्या जनतेला कळायला हवे. पर्यावरण मंत्र्यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण, असेही त्यांनी आपल्या पत्रकात विचारले आहे. 

मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत असे ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु याप्रकरणी 50 दिवसांनंतर साधा एफआयआर देखील दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास कसा करत आहेत, याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला ज्युनिअर ठाकरे यांनी देण्याची आवश्यकता आहे.

दुसरे म्हणजे आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री असूनही त्यांनी असे विधान केले आहे. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृह विभागाच्या अंतर्गत येतो, तरीही या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहेत हे ठाकरे यांना कसे कळले, असाही मुद्दा भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसात मुंबईच्या पोलिस आयुक्तांना आदित्य ठाकरे भेटले अशीही चर्चा आहे. या चर्चेच्या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली का पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कारण कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती, आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत. असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे ज्ञान श्री. ठाकरे यांना कुठून प्राप्त झाले, हे जनतेस कळणे आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

bjp mla atul bhatkhalkar on aaditya thackerays statement in sushant singh rajput case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com