काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा राज्यात 2006 मध्येच आणला होता, भाजपची शरद पवारांवर टीका

काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा राज्यात 2006 मध्येच आणला होता, भाजपची शरद पवारांवर टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आणलेला काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा महाराष्ट्रात आघाडी सरकारने 2006 मध्येच आणला होता. या कायद्यांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार कृषीमंत्री असताना राज्यांना पत्र लिहित होते. सुप्रिया सुळे देखील या कायद्यांचे जाहीर समर्थन करीत होत्या, असे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत हिला भेटायला राज्यपालांना वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टीका पवार यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

शेतकरी आंदोलनाला राज्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत नाही, म्हणून पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अशी खोटी केल्याचेही भातखळकर यांचे म्हणणे आहे. राज्यपालांकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार असून तेथील विधानसभा सत्राच्या अभिभाषणासाठी राज्यपाल तेथे गेले होते, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. 

काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा महाराष्ट्रात 2006 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या आघाडी सरकारने आणला होता, हे राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. शेतकऱ्याला बंधमुक्त करण्याची आवश्यक्ता का आहे, हे लिहिण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात पानंच्या पानं खर्ची घातली आहेत. असं असतानाही पवार या आंदोलनात का सहभागी होत आहेत, हे न कळण्याइतके राज्यातील शेतकरी वा जनता दुधखुळी नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. 

केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी पवार या आंदोलनात सहभागी झाले, असाही दावा भातखळकर यांनी केला आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bjp mla Atul Bhatkhalkar criticism ncp chief Sharad Pawar farmers protest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com