esakal | 'खरा सचिन वाझे कोण? एक की दोन महाराष्ट्राला लवकरच कळेल'

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh
'खरा सचिन वाझे कोण? एक की दोन महाराष्ट्राला लवकरच कळेल'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. आज सकाळी सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर, त्यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात उच्च न्यायालायच्या निर्देशांनुसार अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरु होती.

आज सकाळी सीबीआयने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR दाखल केला. त्यानंतर त्यांच्या वांद्रे, वरळी, नागपूरसह १० ठिकाणी असलेली निवासस्थानं, कार्यालयांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे ७२ मृत्यू

दरम्यान विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने देशमुख यांच्याविरोधातील सीबीआय कारवाईचं समर्थन केलं आहे. "अनिल देशमुखांवर सीबीआयने एफआयआर दाखल केला हे स्वागर्ताह पाऊल आहे. या प्रकरणात खरा सचिन वाझे कोण, एकच सचिन वाझे की दोन-दोन सचिन वाझे आहेत, हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल. अनिल देशमुख महिन्याला १०० कोटींची खंडणी कोणासाठी गोळा करत होते? एफआयआरमुळे त्याचे धागेदोरे शोधणं आता सोपं होईल. यातले खरे गुन्हेगार गजाआड होतील" असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' हेच मोदी सरकारचे सूत्र असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.