esakal | मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे ७२ मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे ७२ मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत मृतांची संख्या वाढली असून आज दिवसभरात 72 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 648 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 47 पुरुष तर 25 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या  रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  22 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 48 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत आज 7221 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6,16,221 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 81,538 हजारांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर 1.31 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही - तात्याराव लहाने

मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 51,63,852 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.31 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 52 दिवसांवर आला आहे. 

मुंबईत गुरुवारी 9541 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5,20,684 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 81,538 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा: सामान्य माणसाला फायझरची लस परवडेल?

मुंबईत 122 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,211 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 35,340 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 993 करण्यात आले.  

जी उत्तर मध्ये 213 नवे रुग्ण

जी उत्तर मध्ये आज 213 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 23,422 झाली आहे.धारावीत आज 50 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6260 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 80 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8545 झाली आहे. माहीम मध्ये 83 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8617 इतके रुग्ण झाले आहेत.