
Navi Mumbai News: मराठी - हिंदी वाद सुरू असताना आता मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत भाजप आमदाराने त्याच्या कार्यालयाला चक्क गुजराती पाटील लावलीय. यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलंय.