

Parag Shah Slapped Auto Driver
ESakal
मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर, भाजप आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात दुकानदारांनी खुर्च्या आणि बाकडे ठेवून पदपथांवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्यामुळे पादचाऱ्यांना मोठी गैरसोय होत होती. त्यांच्या भेटीदरम्यान आमदारांनी कायदा हातात घेतला. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एका ऑटो चालकाला मारहाण केली.