'सैराट'मुळे बलात्कारांमध्ये वाढः भाजप आमदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

मुंबई- ‘सैराट’सारख्या चित्रपटांमुळे मुले बिघडत असून, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. यामुळे ‘सैराट‘ सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी, असे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी म्हटले आहे.

दहिसर मतदार संघातील आमदार असलेल्या चौधरी म्हणाल्या, ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच शिक्षा देण्यात यावी. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषींना शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे बलात्कारानंतर तातडीने नराधामांचे हात तोडले पाहिजेत.‘

दरम्यान, विधानसभेत कोपर्डी बलात्कार प्रकरणावर चर्चा सुरू असताना चौधरी यांनी हे विधान करत ‘सैराट‘सारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली.

Web Title: 'BJP MLA sairata movie rape Growth

टॅग्स