
ठाणे : ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्या तुलनेत नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात, नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून आठ हजार कोटींचा निधी आणण्यात आला आहे. मात्र ठाणे महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकार्यांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून लूट केली आहे. मिळालेल्या निधीतील तब्बल तीन हजार कोटींचा हिशोबच लागत नसल्याचा धडधडीत आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्याने खळबळ उडाली आहे.