Mumbai : नालेसफाईच्या पाहणीसाठी २५ गाड्यांचा ताफा, भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा दौरा

Mumbai BJP president convoy केंद्र सरकार, राज्य सरकारकडून काटकसरीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे भाजपचेच मुंबई अध्यक्ष मात्र तब्बल २५ गाड्यांच्या ताफ्यासह नालेसफाईच्या पाहणीला गेल्याचा प्रकार समोर आलाय.
BJP Mumbai Chief Faces Criticism Over 25 Car Convoy

BJP Mumbai Chief Faces Criticism Over 25 Car Convoy

Esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बाजूला देशवासियांना इंधन आवश्यक तितकं वापरा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा असं आवाहन केलंय. राज्य सरकारकडूनही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकाऱ्यांचे दौरे कमी करण्याचे निर्णय घेतला आहे. तसंच सांस्कृतिक मंत्रालयाने कान महोत्सवासाठी राज्याचं शिष्टमंडळ पाठवणार नसल्याचं सांगत जास्तीजास्त ऑनलाइन बैठका घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्र सरकार, राज्य सरकारकडून काटकसरीचं आवाहन केलं जात असताना दुसरीकडे भाजपचेच मुंबई अध्यक्ष मात्र तब्बल २५ गाड्यांच्या ताफ्यासह नालेसफाईच्या पाहणीला गेल्याचा प्रकार समोर आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com