esakal | राज्यात एका बाजुला पडलेले भाजप नेते राष्ट्रीय कार्यकारिणीत
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde vinod tawade

अमित शहांकडून भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जेपी नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारिणीत काही वरिष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

राज्यात एका बाजुला पडलेले भाजप नेते राष्ट्रीय कार्यकारिणीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. अमित शहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जेपी नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारिणीत काही वरिष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं असून राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना उपाध्यक्षपदी नियुक्त केलं आहे. 

नव्या कार्यकारिणीत तरुणांना आणि महिलांना जास्त संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये एकाही महाराष्ट्रातील चेहऱ्याचा समावेश नाही. नेहमीच चर्चेत असलेले युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यावर युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर रमणसिंह, बैजयंत जय पांडा, अन्नापूर्णा देवी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलं आहे.

हे वाचा - नितीश कुमारांना निवडणूक लढवण्याची वाटते भीती? शेवटचं कधी जिंकले होते

महाराष्ट्रातील काही नेत्यांना नव्या कार्यकारिणीतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन, शाम जाजू यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सचिवांमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांना संधी दिली आहे. तसंच पक्षाच्या सरचिटणीसपदी एनटीआर यांची कन्या पुरंदेश्वरी यांची वर्णी लागली. तर राम माधव, मुरलीधर राव, अनिल जैन यांना सरचिटणीसपदावरून हटवण्यात आलं आहे. अकाली दलाच्या राजीनामास्रामुळे पंजाबमधील तरुण चुग यांना सरचिटणीस पदी नियुक्त केलं आहे.

भाजप युवा मोर्चाचं अध्यक्षपद पूनम महाजन यांच्याकडून आता तेजस्वी सूर्या यांच्याकडे दिलं आहे. यानंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं की, मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने मला दिला याबद्दल मी आभारी आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आता ही जबाबादारी सूर्या यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा.