esakal | राष्ट्रवादी, वंचितचे पदाधिकारी भाजपमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal

राष्ट्रवादी, वंचितचे पदाधिकारी भाजपमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : पालिकेच्या निवडणुका (Election) जवळ येऊन ठेपल्या असून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आऊट गोइंग -इनकमिंग सुरू झाले आहे. माजी राज्यमंत्री आमदार (MLA) रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महासचिव अमित वाधवा आणि भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी मनिष हिंगोराणी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह यांच्यासह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. अमित वाधवा, मनिष हिंगोराणी यांच्यासोबत दिनेश पंजाबी, निकी राक्ता, आनंद मिश्रा, विष्णू चुग, संजय दर्डा, मुकेश छाबडीया, अश्विन बजाज, पवन गुप्ता, सचिन अहिर आदींचा प्रवेश करणाऱ्यात समावेश आहे.

हेही वाचा: आधी हवा डेटा, मगच निवडणुका

या वेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, विरोधी पक्षनेता किशोर वनवारी, नगरसेवक महेश सुखरामानी, प्रदीप रामचंदानी, राजू जग्यासी, शेरी लुंड, राम पारवानी, अजितसिंग लबाना, मनू खेमचंदानी, अमर लुंड आदी उपस्थित होते.

२०२२ च्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप एक हाती सत्ता मिळणार, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पक्षाची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले.

loading image
go to top