

BJP Protest in Dombivli
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर मध्ये सोमवारी रात्री भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा झाला. भाजपच्या महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर यात जीवघेणा हल्ला करण्यात आला असून याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपच्या वतीने डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यावर मुक मोर्चा काढण्यात आला.