esakal | भाजपचे 'चाणक्य' महाराष्ट्रात 'फेल' 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp president amit shah policies failed in maharashtra politics

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खरं खोटं करण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात अमित शहा यांचे नावही दोन्ही नेत्यांनी घेतले. पण, पक्षाचे अध्यक्ष असूनही अमित शहा यांनी यात भाग घेतला नाही. 

भाजपचे 'चाणक्य' महाराष्ट्रात 'फेल' 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त जाहीर सभा घेतलेल्या अमित शहा यांनी सत्ता स्थापनेच्या घडामोडींकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसतं. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खरं खोटं करण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात अमित शहा यांचे नावही दोन्ही नेत्यांनी घेतले. पण, पक्षाचे अध्यक्ष असूनही अमित शहा यांनी यात भाग घेतला नाही.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप

नेत्यांच्या बैठकीत काय घडले?
राज्यपाल भगतसिंग कोश्यार यांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केल्यानंतर भाजपच्या राज्यातील नेत्यांची बैठक झाली. फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक दुपारी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आम्ही संपर्कात असल्याचे सांगतिले. गेल्या 18 दिवसांत भाजप नेत्यांनी अमित शहा  यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. 

धक्कादायक आता भाजपची विरोधात बसायची तयारी?

भाजप चाणक्य 'फेल'
देशाच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या विधानसभा निवडणुकांमध्ये अमित शहा यांनी चाणक्याची भूमिका बजावली. या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही प्रचारात अमित शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. भाजप स्पष्ट बहूमत मिळवणार असा दावा भाजप करत असताना, गेल्या निवडणुकी एवढ्या जागाही भाजपला टिकवता आल्या नाहीत. भाजप 123 वरून 105 जागांवर घसरला. त्यानंतर सत्ता स्थापनेतही जवळपास 20 दिवस शिवसेनेची मनधरणी करण्यात चाणक्य अमित शहा कमी पडले. त्यामुळं अमित शहा महाराष्ट्रात फेल गेल्याची चर्चा सुरू आहे. मुळात मातोश्री अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याचा निर्वाळा अनेकदा शहा यांनी दिला आहे. पण, सत्ता स्थापनेच्या चर्चेत हे संबंध फारसे उपयोगाला आले नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, जर, भाजप विरोधात बसला तर, हे फडणवीस यांच्या इतकेच अमित शहांचेही अपयश असणार आहे. 

loading image