BJP Gen Z Leadership Program
esakal
मुंबई
Maharashtra Politics: ...तर जेन झी इंटर्नशिप कार्यक्रम! मुंबई महापालिकेसंदर्भात भाजपची घोषणा
GenZ Internship Program : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबई महापालिकेत महायुती सत्तेत आल्यानंतर भाजपनेही मोठी घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : तरुण विद्यार्थी, शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासनात सुधारणा करण्यासाठी योगदान देतील, या दृष्टीने मुंबई महापालिकेत महायुती सत्तेत आल्यानंतर जेन झी हा नवीन इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर करू, अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केली.