BMC Election 2026 Rebel Woman Candidate Defeats Mahayuti Nominee

BMC Election 2026 Rebel Woman Candidate Defeats Mahayuti Nominee

Esakal

भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून अर्ज भरला अन् विजय मिळवला; बंडखोराकडून महायुतीच्याच अधिकृत उमेदवाराला धोबीपछाड

BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या बंडखोर उमेदवारानं एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून अर्ज भरला होता. त्या महिला उमेदवाराने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केलाय.
Published on

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत बहुतांश महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला. राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आली. ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, निवडणुकीआधी उमेदवारीवरून राज्यात अनेक ठिकाणी राडा झाला होता. काही ठिकाणी दोन एबी फॉर्म दिले गेल्याचे प्रकारही घडले. तर कुठे परस्पर एबी फॉर्म दिल्याचंही समोर आलं होतं. मुंबईत भाजपच्या एका उमेदवारानं महायुतीच्या उमेदवाराविरोधातच अर्ज भरला होता. डुप्लिकेट एबी फॉर्म भरून निवडणूक लढलेली महिला उमेदवार महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात विजयी झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com