

BJP Muk Morcha
ESakal
मुंबई : ‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाच्या भीतीने ग्रासलेल्या महाविकास आघाडीच्या (मविआ) नेत्यांकडून लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्याचा कट रचला जात आहे,’’ असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. ‘‘हा कट उधळून लावण्यासाठी भाजपच्या बूथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहावे,’’ असे आवाहन त्यांनी केले.