भाजपबरोबर मन रमत नाही  - उद्धव ठाकरे

भाजपबरोबर मन रमत नाही  - उद्धव ठाकरे

मुंबई - सत्तेसाठी शिवसेना लाचार नाही. सत्तेसाठी असलेल्या युतीलाही अर्थ नाही. मन रमत नसेल, तर एकत्र राहण्यात काय अर्थ आहे, अशा शब्दांत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले; मात्र या सरकारचा "नोटीस पीरियड' किती असेल या प्रश्‍नावर, त्यांच्याकडूनही क्‍लीअर होऊ द्या, असे सूचक विधान करून भाजपला "व्हेंटिलेटर'वर ठेवले. 

मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी थेट भाजपलाच टार्गेट केले. आम्ही मैत्री तोडत नाही. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो. विधानसभेला त्यांनी युती तोडली. आता महानगरपालिकेच्या वेळेलाही त्यांची रणनीती, पारदर्शकता पाहून आम्ही विचार केला, निर्णय घेतला. आम्ही त्यांना बांधील नाही. आता ते म्हणतात, मनभेद नाहीत, मतभेद आहेत; पण मनभेद असण्यासाठी मने असणे आवश्‍यक आहे. मन रमत नसेल, तर काही अर्थ नाही. याला पूर्णविराम द्यायला हवा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली; मात्र भाजप सरकारचा नोटीस पीरियड किती, या प्रश्‍नाला बगल देत ते म्हणाले, "ते असे सांगता येत नाही; मात्र योग्य वेळी निर्णय घेऊ.' सध्या आम्ही एकटे लढत असून युतीशिवाय बहुमताने निवडून येऊ, असेही त्यांनी नमूद केले. 

शिवसेना-भाजपचे नाते कमालीचे ताणल्याचे जाणवते आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणत असल्याचे तसेच दोन्हीकडच्या पक्षप्रमुखांना आव्हान देत असल्याचे दिसत आहे; तरीही शिवसेनेचे मंत्री खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर काढत नाहीत, याचे कारण कदाचित आजही उद्धव ठाकरे भाजपच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असल्याचे संकेत देण्यात आले. भाजपने शिवसेनेवरील आरोप थांबवले नाहीत, तर शिवसेनेला कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडावे लागेल. "त्यांच्याकडूनही क्‍लीअर होऊ द्या,' असे सांगत ठाकरे यांनी भाजपच्या कोर्टात युतीचा चेंडू ढकलला आहे, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com