मुंबईत भाजपचे चार शिवसेनेचे तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या 17 पैकी आठ प्रभाग समित्यांची मंगळवारी निवडणूक झाली. भाजपने चार आणि शिवसेनेने तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व मिळवले. अखिल भारतीय सेनेला एका समितीचे अध्यक्षपद मिळाले. ए, बी आणि ई प्रभागांत निवडणूक झाली. इतर प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

भाजप पुरस्कृत अभासेच्या गीता गवळी ए, बी, ई प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या पाठिंबाने विजयी झाल्या. बाकी प्रभाग समित्यांवर शिवसेना-भाजपच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. सी आणि डी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी ज्योत्स्ना मेहता (भाजप), एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी प्रल्हाद ठोंबरे (शिवसेना), जी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी आशीष चेंबूरकर (शिवसेना), पी दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी राजुल देसाई (भाजप), पी उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दक्षा पटेल (भाजप), आर दक्षिण समितीच्या अध्यक्षपदी कमलेश यादव (भाजप), आर उत्तर आणि आर मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी शीतल म्हात्रे (शिवसेना) आदींची निवड झाली आहे.

Web Title: bjp shivsena domination on ward committee