

BJP’s entry stirs politics in CM Eknath Shinde’s Ambernath stronghold; new equations emerge.
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात मोडणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आता भाजपनेच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील अंबरनाथ नगरपरिषदेवर आतापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकत आला होता. मात्र, आगामी निवडणुकीत “स्वबळावर” लढण्याचा नारा देत भाजपने आता शिंदे गटाच्या गडात थेट प्रवेश केला आहे. या हालचालीने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना–भाजप संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.