

Farmer Loan Waiver
ESakal
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभे आहे" असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले. पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला.