'पारदर्शक' सभेच्या प्रभागात भाजपची मुसंडी...

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

याच प्रभागातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने, मुक्ता टिळक, गायत्री  खडके, राजेश येनपुरे यांनी प्रतिस्पर्ध्यांना सहज पराभूत करत मुख्यमंत्र्यांना विजयाची भेट दिले आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून यंदाच्या निवडणुकीत भाजपने युती न करता 
स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात ज्या 'पारदर्शक सभेचा अनुभव घ्यावा लागला होता, त्याच प्रभाग क्रमांक 15 शनिवार-सदाशिव पेठमध्ये 
भाजपचे अख्खे पॅनेल निवडून येत या सभेचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले. याच प्रभागात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरविणारे नागरिक कौल कोणाला देणार हा उत्सुकतेचा विषय बनला होता. याच प्रभागातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने, मुक्ता टिळक, गायत्री 
खडके, राजेश येनपुरे यांनी प्रतिस्पर्ध्यांना सहज पराभूत करत मुख्यमंत्र्यांना विजयाची भेट दिले आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून यंदाच्या निवडणुकीत भाजपने युती न करता 
स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. 

पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर शनिवारी (18 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण, सभेला मोजकी गर्दी 
झाल्याने मुख्यमंत्र्यांना सभा न घेता पुढे जावे लागले होते. या सभेनंतर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज 
ठाकरे यांनी त्यांची पारदर्शक सभा अशी खिल्ली उडविली होती.

आता याच शनिवार-सदाशिव पेठेत 62.51 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे विजयाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले होते. पण, 
शनिवार-सदाशिव पेठेतील मतदारांनी दुपारच्या सभेला गर्दी न करता मतदानासाठी रांगा लावून भाजपला निवडून दिले.

Web Title: BJP surges in Pune